Kalki Koechlin's replace this actress will appear in 'Hathi Mare Saathi' movie | 'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री
'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

ठळक मुद्देश्रिया पिळगावकर दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटातकल्की कोचलिनच्या जागी दिसणार श्रिया पिळगावकर

अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र आता या चित्रपटात कल्कीच्या जागी अभिनेत्री श्रिया पिळगावकरची वर्णी लागल्याचे समजते आहे. ही माहिती खुद्द श्रियाने आपल्या सोशल मीडियावर दिली आहे.

श्रिया पिळगावकर राणा दग्गुबातीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातून श्रिया दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

श्रिया नुकतीच अॅमेझॉन प्राइमवरील मिर्झापूर वेबसीरिजमध्ये स्वीटी गुप्ताच्या भूमिकेत पाहायला मिळाली. या सीरिजला व तिच्या भूमिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

श्रियाने शाहरूख खानसोबत फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट अभी तो पार्टी शुरू हुई है आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा बीचम हाऊसमध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे. श्रियासाठी नवे वर्ष खास असणार हे नक्की.

English summary :
Rana Daggubati will soon be seen in the film 'Hathi Mere Saathi'. Actor Kalki Koechlin replaced by Maharashtrian Shriya Pilgaonkar. This information has been given by Shriya Pilgaonkar on social media.


Web Title: Kalki Koechlin's replace this actress will appear in 'Hathi Mare Saathi' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.