GOOD NEWS ! ‘ही’ बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, पाच महिन्यांची आहे प्रेग्नंट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:31 PM2019-09-29T12:31:52+5:302019-09-29T12:32:31+5:30

‘ही’ अभिनेत्री पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि लवकरच वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देणार आहे.

kalki koechlin reveals she is five months pregnant with boyfriend guy hershberg | GOOD NEWS ! ‘ही’ बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, पाच महिन्यांची आहे प्रेग्नंट!!

GOOD NEWS ! ‘ही’ बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, पाच महिन्यांची आहे प्रेग्नंट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे  2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स-वाईफ कल्की कोच्लिन हिच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. याचदरम्यान कल्कीबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेणारी आणि सध्या एका इस्रायली पियानो वादकाच्या प्रेमात असलेली कल्की प्रेग्नंट आहे. दीर्घकाळापासून कल्कीने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. याचे कारण म्हणजे, प्रेग्नंसी. होय, कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि याचमुळे तिने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही.


हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. वॉटर बर्थद्वारे ती बाळाला जन्म देणार आहे. तिने स्वत: हा खुलासा केला. प्रेग्नंसीदरम्यान शरीरात आणि आयुष्यात होणारे बदल जाणवू लागले आहेत. मी स्वत:ची आधीपेक्षा अधिक काळजी घेतेय. माझ्या शारीरिक हालचालींमध्ये काहीसा संथपणा आला आहे. पण मी आनंदी आहे. मातृत्व ही एक आनंददायी भावना आहे, असे ती म्हणाली.


सध्या कल्की इस्रायली पियानो वादक Guy Hershberg  याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कल्कीने काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत, हे नाते जगजाहिर केले होते. या फोटोत कल्की बॉयफ्रेन्डला किस करताना दिसली होती.
  2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.


 कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती. मध्यंतरी ती आणि अभिनेता जिम सर्भ यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले होते. पण या सगळ्या अफवा सिद्ध झाल्या. पण आता कल्की प्रेमात पडलीय. नुसतीच प्रेमात नाही तर आता ती आई देखील होणार आहे.

Web Title: kalki koechlin reveals she is five months pregnant with boyfriend guy hershberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.