लग्नाआधीच आई होणाऱ्या या अभिनेत्रीनं केलं बेबी बंपसोबत फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:58 PM2019-12-07T15:58:39+5:302019-12-07T15:59:00+5:30

या अभिनेत्रीला सुरुवातीच्या दोन महिन्यांत ती प्रेग्नंट असल्याचं माहित नव्हते

Kalki Koechlin flaunts her baby bump in her latest photoshoot for Grazia | लग्नाआधीच आई होणाऱ्या या अभिनेत्रीनं केलं बेबी बंपसोबत फोटोशूट

लग्नाआधीच आई होणाऱ्या या अभिनेत्रीनं केलं बेबी बंपसोबत फोटोशूट

googlenewsNext

कल्की कोचलिन लवकरच आई बनणार आहे. नुकतेच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये प्रेग्नेंट कल्की बेबी बंप व चेहऱ्यावर नॅचरल ग्लोमध्ये सुंदर दिसते आहे.

खरेतर कल्की कोचलिनने ग्राझिया मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये कल्कीने पेस्टल कलरमधील लाइट रंगाचा आऊटफिट कॅरी केलं होतं. एक डायमंड लॉकेटसोबत लाइट मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

सुरुवातीच्या दोन महिन्यांत खुद्द कल्कीलाही आपण प्रेग्नंट आहोत हे माहित नव्हते. तिने सांगितलं की, सुरुवातीच्या दोन महिन्यांत मी प्रेग्नंट आहे, याची मला स्वत:लाही कल्पना नव्हती. एखाद्या एलियनने आक्रमण करावे, असे हे होते. जणू वॅम्पायर सारखे काही माझ्या शरीरातले सगळे काही शोषून घेत होते. पण पहिल्यांदा गर्भातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. ते सगळे रोमांचक होते. गर्भावस्थेचे पहिले तीन महिने अतिशय वाईट होते. पण आता सगळे काही ठीक आहे,असे कल्कीने 'मिड डे' ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत सांगितले.


कल्की यावेळी लग्नाबद्दलही बोलली. आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. पण केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली.


घटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. 

2009 मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

Web Title: Kalki Koechlin flaunts her baby bump in her latest photoshoot for Grazia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.