ठळक मुद्देघटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय.

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये प्रेग्नंट नट्या जगापुढे यायला घाबरायच्या. पण आता काळ बदललाय. आता बेबी बम्प फ्लॉन्ट करण्याचा ट्रेंड आहे. ताजे उदाहरण म्हणजे, अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचे. कल्कीने बेबी बम्प फ्लॉन्ट करत स्टाईलिश फोटोशूट केले आहे. कल्की सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे.

आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्साहित आहे. लवकरच कल्की बाळाला जन्म देईल. पण तरीही ती कामात बिझी आहे.


35 वर्षांच्या कल्कीने नुकतेच एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केले. यात बेबी बम्पसह तिने सुपर हॉट पोज दिल्या आहेत.


 काही दिवसांपूर्वीही अन्य एका मॅगझिनसाठी तिने फोटोशूट केले होते. या फोटोंमध्येही तिच्या चेह-यावरचा प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसला होता.


घटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.

अभिनेत्री कल्की कोच्लिन लग्नाआधी आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कल्कीने अचानक आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण खरे सांगायचे तर सुरुवातीच्या दोन महिन्यांत खुद्द कल्कीलाही आपण प्रेग्नंट आहोत हे माहित नव्हते. होय, खुद्द कल्कीने हा खुलासा केला होता.


2009 मध्ये  देव डी  या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

Web Title: kalki koechlin is enjoying her pregnancy and shares her maternity photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.