लग्नाआधीच प्रेग्नंट असणे हे बॉलिवूड अभिनेत्रींसाठी काही नवे नाही. याच यादीत आता कल्की कोचलिनचेही नाव गणले जाते. सध्या ती प्रेग्नंसीमुळे खूप चर्चेत आहे.  एका इस्रायली पियानो वादकाला ती डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कल्की सा-यांचे लक्ष वेधून घेते. इकतेच नाही तर बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कल्कीच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करिअर विषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.  

२००९ साली ती ‘देवडी’ या सिनेमामुळे पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली होती. या सिनेमात तिने वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु या सिनेमा ती खरोखरच देहविक्री करते की काय असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे तिची कॉलगर्ल अशी इमेज झाली होती. जिथे जिथे ती जायची तिला  ‘रशियन कॉल गर्ल’ म्हणून चिडवायचे.  या सिनेमामुळे कॉलगर्ल इमेजमुळे तिला बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. 


तसेच कल्की यावेळी लग्नाबद्दलही बोलली. आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. पण केवळ मी लग्नाआधी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचे नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी वा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. पण तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत, असे कल्की म्हणाली.


2009 मध्ये 'देव डी' या सिनेमाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती.


 

Web Title: Kalki Koechlin Called Russian Call Girl After Dev D Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.