अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच बाळाला जन्म देणार आहे. कल्की एका इस्रायली पियानो वादकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. करीना कपूर खानच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट २' या शोमध्ये तिने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी कल्कीने करीना कपूरसमोर खुल्‍या मनाने अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटामागचा खुलासा केला.

करीना कपूरशी गप्पा मारताना कल्की कोचलिन अनुराग कश्यपसोबत विभक्त होण्याच्या निर्णयामागाची पार्श्वभूमी सांगितली. ती म्हणाली की, 'तसा वेळ लागला. आम्‍ही वेगळे होण्‍यासाठी खूप विचार केला. पण आम्‍ही एकमेकांच्‍या कामाचा आदर करतो. तुम्‍ही अशा व्‍यक्‍तीवर प्रेम करत असला तरी त्‍याच्‍यासोबत राहू शकत नाही. आम्‍ही दोघांनीही ते ओळखले.''


ती पुढे म्‍हणाली, ''त्‍यासाठी काळ देखील महत्त्‍वाचा असतो, बरोबर ना? मला वाटते की कधी-कधी दोघांचा काळ वेगळा असल्‍याने देखील असे घडले असेल. जसे मी तरूण होते आणि तो खूपच मोठा होता तसेच आमच्‍यात ताळमेळ देखील नव्‍हता. आम्‍हाला त्‍यावेळी वेगळ्या गोष्‍टी अपेक्षित होत्‍या. मला वाटते त्‍याच गोष्‍टीमुळे मोठा फरक झाला.'' 


तसेच यावेळी कल्कीने तिच्या प्रेग्नेंसीबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. याशिवाय तिच्या प्रेग्नेंसीवर कुटुंबीयांची काय रिअॅक्शन होती हेही तिने सांगितले. कल्की म्हणाली, माझ्या नशिबाने माझे कुटुंब पारंपारिक विचारसरणीचे नाहीय. माझी आई म्हणाली होती की,पुढच्या वेळी तू लग्न करशील तेव्हा ते आयुष्यभरासाठी आहे याची खात्री करुन घे. असे ती यासाठी म्हणाली कारण माझा एक घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तिला माझ्या लग्नाची घाई नव्हती.


२००९ मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती.

यानंतर २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Web Title: Kalki Kochlin reveals divorce with Anurag Kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.