kajol revealed his father shomu mukherjee was agaist of her and ajay devgns marriage that time | अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला होता वडिलांचा विरोध, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला होता वडिलांचा विरोध, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

काजोल आणि अजय देवगणची जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन चाहत्यांची आवडती आहे. दोघेही सुखांने संसार करत आहेत.  त्यांच्या लग्नाला जवळपास 20 वर्षे होणार आहेत. काजोल आणि अजय देवगणचं लग्न हे तिच्या  वडिलांच्या इच्छेविरूद्ध झाले असा खुलासा तिने केला.  यात त्याच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता.


 वयाच्या 24 व्या वर्षी लग्न करण्याची इच्छा नव्हती
 काजोल आणि अजय देवगणचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चालले आहे.  नीसा आणि युग अशी दोन मुलं आहेत आणि ते दोघेही पालकांची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत.  लग्नानंतरही काजोल आज चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.  काजोल एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला.  ती म्हणाली, तिचे वडील शोमू मुखर्जी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते. लग्नाआधी काजोलने काम करावे अशी त्याची इच्छा होती.  मात्र, काजोलच्या या निर्णयाला तिची आई तनुजा यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला.

 काजोलची आई तनुजाने तिला पाठिंबा दिला 
काजोलने सांगितले की, तिच्या आई तनुजा सांगितले आपण आपल्या मनाचे ऐकले पाहिजे.  अजय देवगण आणि काजोलचे २४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न झाले.  यावर्षी त्यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण होतील.  वर्क फ्रंटबद्दल बोलताना, काजोलचा 'त्रिभंगा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  २०२० मध्ये  'तन्हाजी' सुपरहिट ठरला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kajol revealed his father shomu mukherjee was agaist of her and ajay devgns marriage that time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.