ठळक मुद्देकाजोलने 1999 मध्ये अभिनेता अजय देवगणबरोबर लग्न केले.  त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोल हिचा आज वाढदिवस. आपल्या फिल्मी करिअरमध्ये काजोल कायम वादांपासून दूर राहिली. पण अभिनेत्री रेखासोबतच्या फोटोशूटमुळे ती चांगलीच वादात सापडली होती. रेखा आणि काजोलचे हे फोटोशूट त्याकाळी प्रचंड वादग्रस्त ठरले होते.
काजोल-रेखाचे हे बोल्ड फोटोशूट सिने ब्लिट्स या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकले होते. जानेवारी 1996 रोजी या बोल्ड फोटोशूटचे फोटो मॅगझिनमध्ये झळकले आणि सगळीकडे खळबळ माजली. यातील एक फोटो तर चांगलाच वादग्रस्त ठरला.

यात काजोल व रेखा यांनी एकच स्वेटर घातले होते. त्याशिवाय दोघींच्याही अंगावर एकही कपडा नव्हता. त्याकाळात असे फोटोशूट लोक पचवू शकले नाहीत.

यावरून रेखा व काजोल दोघींवरची बरीच टीका झाली. अनेक संस्कृतीरक्षकांनी याविरोधात रान माजवले.

या वादादरम्यान काजोल नवीनवी बॉलिवूडमध्ये आली होती तर रेखा एक मोठी अभिनेत्री होती. अनेक दिवस दोघींच्याही या बोल्ड फोटोशूटची चर्चा होती.
काजोलने सिनेसृष्टीत पदार्पण केले तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.  ‘बेखुदी’ या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. ‘गुप्त’मध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तिच्यासाठी सगळ्यात कठीण होती. नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री आहे.
काजोलने 1999 मध्ये अभिनेता अजय देवगणबरोबर लग्न केले.  त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. आपल्या सिने करिअरमध्ये काजोलने अजय देवगण, बॉबी देओल, सलमान खान अशा अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. पण काजोल आणि शाहरूख खानची जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली.
 


Web Title: Kajol Rekha Bold Photoshoot Make Controversies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.