kajol hilarious reply when fan asked would she married shahrukh khan if did not meet ajay devgn | - तर तू शाहरूखसोबत लग्न केलं असतंस? वाचा, काजोलचे भन्नाट उत्तर
- तर तू शाहरूखसोबत लग्न केलं असतंस? वाचा, काजोलचे भन्नाट उत्तर

ठळक मुद्देलवकरच काजोल ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अजय देवगण लीड रोलमध्ये आहे.

90 च्या दशकात शाहरूख खान आणि काजोल या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आजही तुमची आवडती बॉलिवूड जोडी कोण, असे विचारल्यास अनेकांचे उत्तर काजोल-शाहरूख असेच येईल. 1993 साली ‘बाजीगर’ या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकलेल्या या जोडीने यानंतर अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. यातल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाने तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम तोडलेत. करण अर्जुन, कुछ कुछ होता है, दिलवाले, कभी खुशी कभी गम, माई नेम इज खान अशा अनेक चित्रपटात काजोल व शाहरूखची केमिस्ट्री हटके ठरली.

रिल लाईफमध्ये इतक्या लोकप्रिय ठरलेल्या या जोडीला रिअल लाईफमध्ये एकत्र पाहण्याचा मोह कुणाला होणार नाही? याच मोहापोटी एका चाहत्याला एक वेगळा प्रश्न पडला. होय, ‘अजय देवगण भेटला नसता तर तू शाहरूखसोबत लग्न केलं असतंस?’ असा प्रश्न या चाहत्याने काजोलला विचारला. खर तर या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण काजोलने यावर अगदी तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे उत्तर दिले. ‘पुरूषाने प्रपोज करायला नको का?’ असे उत्तर तिने दिले.

शाहरुखसोबत पुन्हा काम करणार का? असा प्रश्न  एका चाहत्याने काजोलला केला. यावर ‘शाहरूखला विचारा,’ असे काजोल म्हणाली.
तुझा पहिला क्रश कोण होता? या प्रश्नावर ‘माझ्या पहिल्या क्रशसोबत मी लग्न केले,’ असे उत्तर काजोलने दिले.
गमतीचा भाग सोडला तरी, या प्रश्नोत्तराच्या खेळाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. हा प्रश्न-उत्तरांचा खेळ काजोलने  सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  
लवकरच काजोल ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अजय देवगण लीड रोलमध्ये आहे.

Web Title: kajol hilarious reply when fan asked would she married shahrukh khan if did not meet ajay devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.