बॉलिवूडमधील अजय देवगण आणि काजोल सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. अजयही काजोलची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. काजोलही अजय देवगणची तितकीच काळजी करते. विशेष म्हणजे सेलिब्रेटी म्हटले तर त्यांचे लक्झरीअस लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे ते स्पष्ट होते. मात्र काजोल अजय देवगणचा पैसा जास्त खर्च होवू नये. यासाठी  स्वस्त वस्तू खरेदी करणं पसंत करते. 

खुद्द अजय देवगनने याची कबुली दिली होती. इतकेच काय तर सर्वसामान्यांप्रमाणे वस्तू खरेदी करताना बारगेनिंगही काजोल चांगल्या प्रकारे करत असे खुद्द तिनेच एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. काजोलला स्वत: वर जास्त पैसे खर्च करायला आवडत नाही आणि ती कधीच महागड्या भेटवस्तूंची खरेदीही करत नाही.

 

इतर सेलिब्रिटींप्रमाणे ब्रॅंडेड वस्तूं खरेदी करण्यावर तिचा कल नसतो. जे खिशाला परवडेल आणि स्वत, मस्त आणि टीकाऊ असेल अशाच गोष्टी ती खरेदी करते. उगाच गरज नसताना वस्तू खरेदी करण्यापेक्षा बचत कशी होईल यावरच ती जास्त लक्ष देते.

अजय देवगन आणि काजोल या रिअल लाईफ जोडप्याने या सिनेमाच्या निमित्ताने 11 वर्षांनंतर एकत्र काम केले होते. काजोलने यात तान्हाजीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने 5 कोटी इतके मानधन घेतले होते. या सिनेमात अजयने इतका दमदार अभिनय केला, त्याचे कौतुक करताना लोक थकले नाहीत. तान्हाजीच्या भूमिकेसाठी अजयने प्रचंड मेहनत घेतली. तितकीच घसघशीत फी सुद्धा घेतली. अजयला या सिनेमासाठी 30 कोटी इतकी भरमसाठ फी मिळाली होती.

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजय आणि काजोला यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kajol does one thing to save Ajay Devgan's money, after listening to this, you will say 'God give such a wife to everyone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.