लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:36 PM2021-06-19T19:36:10+5:302021-06-19T19:40:40+5:30

काजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर एकही सिनेमाची ऑफर तिला मिळालेली नाहीय.

Kajal Aggarwal had reduced the fee by half for not getting work After Marriage | लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात

लग्नानंतर काजल अग्रवालला मानधनात करावी लागली कपात, चांगल्या ऑफर्सच्या शोधात

Next

हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत काजल अग्रवाने रसिकांची पसंती मिळवली होती. काही महिन्यांपूर्वीच गौतम किचलूसोबत लग्नबंधात अडकत तिने संसाराला सुरुवात केली आहे.लग्नानंतर वेगवेगळ्या गोष्टी करताना काजल अग्रवाल दिसली.पतीसोबत निवांत क्षण एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवली. हनिमून पिरअड एन्जॉय केल्यानंतर आता रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी काजल अग्रवाल सज्ज झाली आहे. त्यासाठी चांगल्या ऑफर्स मिळण्याची ती वाट बघत आहे. 

काजलला लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नानंतर एकही सिनेमाची ऑफर तिला मिळालेली नाहीय.लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरलाही ब्रेक लागतो असे बोलले जाते. काही अभिनेत्रींचे मात्र लग्नानंतरही करिअर यशाच्या शिखरावर राहिले तर काहींचे संपले आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअरला ब्रेक लागला. लग्नानंतर इंडस्ट्रीत मिळवलेले स्थान कायम राहावे तेच टिकवण्याचा प्रयत्न काजल अग्रवाल करत आहे. इतकंच काय तर सिनेमाच्या ऑफर्स मिळत राहाव्या यासाठी तिने तिच्या मानधनातही कपात केल्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

कोरोनामुळे मनोरंजनसृष्टीही मंदावली आहे. त्यामुळे तगडे मानधन घेणा-या कलाकरांऐवजी कमी मानधन घेणा-या कलाकरांनाच निर्मात्यांची पहिली पंसती आहे. याचा फटका मोठ्या कलाकारांना बसला आहे. गलेलठ्ठ कमाई करणारे कलाकारांना घरीच बसण्याची वेळ आली आहे. पाहिजे ते मानधन मिळत नसल्यामुळे कलाकार आलेल्या ऑफर्स नाकारत असल्याचीही उदाहरणं आहेत. 

वेळीच सावध होत काजल अग्रवाल कमी मानधनातही काम करण्यासाठी तयार झाली आहे.तसेही लग्नानंतर सिनेमांच्या ऑफर्सही तिच्याकडे नाहीत. लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलंय.लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही याचाच धसका काजल अग्रवालने घेतल्याचे स्पष्ट होते. लग्न केल्याचा फटका बसू नये म्हणून काजल अग्रवालने पहिल्यांदाच करिअरमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kajal Aggarwal had reduced the fee by half for not getting work After Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app