Kabir singh box office collection day 24 forth weekend | शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' करतोय बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड

शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' करतोय बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चौथ्या आठवड्यातही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये इतकी कमाई करणार हा पहिला सिनेमा आहे. शाहिद ही कबीर सिंगच्या यशाला घेऊन खूपच उत्साही आहे. लवकरच त्याचा सिनेमा 260 कोटींचा आकडा गाठणार आहे. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टीका होत असली तरी सुद्धा या चित्रपटगृहातील गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. या सिनेमाची कथा, गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटातील कियाराची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स प्रचंड फेमस झाले आहेत. 
सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करून सांगितले की, 'कबीर सिंग' चौथ्या आठवड्यात सुपर स्ट्रॉन्ग झाला आहे. चौथ्या आठवड्यात कबीर सिंगने 10.34 कोटींची  कमाई केली आहे. ऐकूण आतापर्यंत या सिनेमाने 259.94 कोटींचा बिझनेस केला आहे. 
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स  ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सणकी हिरो अनेकांना भावला नाही. पण काहींना हा कबीर सिंग प्रचंड आवडला असून ते त्याच्या प्रेमात पडले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kabir singh box office collection day 24 forth weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.