ठळक मुद्देजुहीने इन्स्टाग्रामवर तिच्या सासूचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, मी माझी सासू सुनैना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1 हजार झाडे लावत आहे.

जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जुहीने तिच्या सासूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तिने त्यांना वाढदिवसाला कोणती भेटवस्तू दिली हे देखील तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

जुहीने इन्स्टाग्रामवर तिच्या सासूचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, मी माझी सासू सुनैना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1 हजार झाडे लावत आहे. जेव्हा मी कोणत्याही समस्येने त्रस्त असते, माझे जग आता संपुष्टात आले असे मला वाटते. त्यावेळी त्यांनीच मला नेहमीच साथ दिली आहे. मी कुठेतरी हरवतेय असे मला वाटत असताना त्या नेहमीच माझ्यासोबत होत्या. 

जय आणि जुहीने अतिशय साधेपणाने, कोणताही गाजावाजा न करता लग्न केले होते. जय यांचे हे दुसरे लग्न असून त्यांचे पहिले लग्न यश बिर्ला यांची बहीण सुजाता बिर्ला यांच्यासोबत झाले होते. पण एका विमान अपघातात सुजाता यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जवळजवळ पाच वर्षांनंतर जुही आणि जय यांचे लग्न झाले. जुही आणि जय यांच्या प्रेमकथेविषयी जुही न बोलणेच पसंत करते. पण एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी झुमला दिलेल्या मुलाखतीत जुहीला खूश करण्यासाठी जय लग्नाच्याआधी काय काय करायचे हे तिने सांगितले होते. 

जुहीने मुलाखतीत सांगितले होते की, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जवळजवळ वर्षंभर दररोज मला जय फूलं आणि गिफ्ट्स पाठवायचे. ही रोजची फूलं आणि गिफ्ट्स पाहून जय काही काम करतो की नाही हाच प्रश्न मला पडायचा. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर मला जयने ट्रकभरून गुलाब पाठवले होते. हे इतके गुलाब ठेवायचे कुठे हा प्रश्न मला पडला होता. 

या मुलाखतीत जुहीने पुढे सांगितले होते की, लग्नापूर्वी मला खूश करण्याची एकही संधी जय सोडत नसे. मी जिथे चित्रीकरण करत असे, तिथे तो येत असे. आम्ही एकमेकांना ओळखायला लागल्यानंतर काहीच महिन्यांत आम्ही लग्न केले. 


Web Title: juhi chawla planted 1000 tress on her mother in law birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.