'हश हश'च्या निमित्ताने पुरस्कार विजेत्या अभिनेत्री जुही चावला आणि आयशा झुल्का डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहेत. त्यांच्याबरोबर या सीरिजमध्ये कृतिका कामरा, करीश्मा तन्ना, सोहा अली खान, शहाना गोस्वामी यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत. ही कहाणी मूलत: स्त्रियांच्या नजरेतून उलगडणारी असून, स्वत:ची कहाणी सांगणाऱ्या महिलांच्या कथनातून तिचे कथानक उलगडत जाणार आहे. 

'हश हश'साठी प्रोडक्शन डिझायनर, कॉस्च्युम डिझआयनर, सुपरवायझिंग प्रोड्युसर, को-प्रोड्युसर्सपासून ते आर्ट, कॉस्च्युम, प्रोडक्शन कोऑर्डिनेशन पासून ते अगदी सिक्युरिटी टीमपर्यंत बहुतेक सर्वं तांत्रिक कामेही स्त्रियाच सांभाळणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संपूर्णपणे स्त्री कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा संच घेऊन बनविण्यात आलेल्या आपल्या ''हश हश'' या मालिकेची घोषणा करण्यासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओने जय्यत तयारी केली आहे.

''हश हश''ही एका खंबीर नायिकेची कहाणी आहे हे तर झालेच, पण या मालिकेसाठी कॅमेऱ्यामागच्या वेगवेगळ्या कामांची जबाबदारीसुद्धा अत्यंत कुशल अशा स्त्रियांनी पेलली आहे.

तनुजा चंद्रा या मालिकेच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि एक्झेक्युटिव्ह प्रोड्युसर असणार आहेत तर शिखा शर्मा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मूळ कथा लेखक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक जुही चतुर्वेदी यांना मालिकेच्या संवाद लेखनासाठी करारबद्ध करण्यात आले आहे.

ऍड-फिल्म्सच्या क्षेत्रातील काही उदयोन्मुख नावांपैकी एक कोपल नाथानी या मालिकेच्या एपिसोड डायरेक्टर असणार आहेत. ही मालिकेची निर्मिती विक्रम मल्होत्रा यांच्या एबंडंशिया एंटरटेन्‍मेंटद्वारे केली जाणार आहे. 'हश हश' ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Juhi Chawla and Ayesha Jhulka will make their digital debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.