jolly llb 2 maker would have made more money if i and boman were in the film in the place of akshay kumar said arshad warsi | अक्षय कुमारच्या जागी मी असतो तर...! ‘Jolly LLB 2’वर बोलला अर्शद वारसी!!
अक्षय कुमारच्या जागी मी असतो तर...! ‘Jolly LLB 2’वर बोलला अर्शद वारसी!!

ठळक मुद्दे०१३ मध्ये आलेल्या अर्शदच्या ‘जॉली एल एल बी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई  केली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला होता. त्यामुळेचं मेकर्सनी या चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतला.

अर्शद वारसी त्याच्या कॉमिक टाईमिंगसाठी ओळखला जातो. याचमुळे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी त्याला पुन्हा एकदा पसंती दिली आहे. लवकरच अर्शद ‘मुन्नाभाई 3’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे आणि संजय दत्त व अर्शद वारसी ही ‘मुन्ना व सर्कीट’ची जोडी पुन्हा एकदा धूम करणार आहे. पण तूर्तास अर्शदबद्दलची एक मोठी बातमी आहे. होय, ‘जॉली एल एल बी २’ या चित्रपटावर अर्शद बोलला आणि त्याची बातमी झाली.


तुम्हाला आठवत असेलचं की, २०१३ मध्ये आलेल्या अर्शदच्या ‘जॉली एल एल बी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई  केली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला होता. त्यामुळेचं मेकर्सनी या चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतला. या दुस-या भागातही अर्शदचं मुख्य भूमिकेत असेल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण दुस-या भागात अर्शद ऐवजी मेकर्सनी अक्षय कुमारला घेतले. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटानेही १०० कोटींचा बिझनेस केला. पण अर्शदचे मानाल तर अक्षयला घेणे हा चुकीचा निर्णय होता. होय, ताज्या मुलाखतीत अर्शद वारसीने स्वत: हे बोलून टाकले. ‘जॉली एल एल बी 2मध्ये अक्षयच्या जागी मी आणि बोमन इराणी असतो तरी या चित्रपटाने १०० कोटींचाच बिझनेस केला असतो. शिवाय आमच्यामुळे निर्मात्यांना अधिक फायदा झाला असता. अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टारला त्यांनी जितके पैसे दिलेत, तितके आम्हाला द्यावे लागले नसते. माझे मत मागाल तर, या चित्रपटात अक्षय कुमारला घेणे हा निर्मात्यांचा चुकीचा निर्णय होता,’असे अर्शद यावेळी म्हणाला.


अर्शद वारसीच्या या शब्दांकडे जरा चिकित्सक नजरेतून बघितल्यावर एक गोष्ट कळते. ती म्हणजे, निर्माते मोठ मोठ्या स्टार्समागे पळतात अन् हे करताना आपला चित्रपट कसा आहे, त्यात किती दम आहे, हे विसरतात. होय ना??
 
 

Web Title: jolly llb 2 maker would have made more money if i and boman were in the film in the place of akshay kumar said arshad warsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.