एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 05:45 PM2021-02-26T17:45:16+5:302021-02-26T17:49:59+5:30

Mumbai Saga Trailer:  ट्रेलरची सुरुवात होते ती मुळी जॉनच्या जबरदस्त अ‍ॅक्शनने...

john abraham starrer Mumbai Saga Trailer out | एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच

एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या 19 मार्चला संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

जॉन अब्राहम आणि इमरान खानचा दमदार अ‍ॅक्शनने भरलेला ‘मुंबई सागा’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी रिलीज झाला आणि रिलीज होताच, सोशल मीडियावर हिट झाला. जॉन पुन्हा एकदा फुल अ‍ॅक्शन अवतारात आहे आणि इमरान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे.
चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा दमदार, जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरची सुरुवात होते ती मुळी जॉनच्या जबरदस्त अ‍ॅक्शनने. जिसने भी हफ्ता दिया, अगला हाथ उसका कटेगा. आज से हफ्ता बंद... असे जॉन म्हणतो आणि यानंतर जॉनची स्टोरी दिसते.

जॉन या सिनेमात अमर्त्य रावची भूमिका साकारताना दिसणार आहे. इमरान हाश्मी पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये सुनील शेट्टीदेखील एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसून येतोय. यासोबतच महेश मांजरेकर आणि अमोल गुप्ते यांची झलकही पाहायला मिळतेय.

ट्रेलरमधील डायलॉग जबरदस्त आहेत. ट्रेलरमध्ये इमरान जॉनला म्हणतो, ‘मेरी गोली से बचने के लिए तुझे बार बार खुशकिस्मत होना पडेगा और मुझे सिर्फ एक बार...’. यावर जॉन म्हणतो, ‘फिर देखते है आज किस्मत तुझ पर एक बार मेहरबान होती है या मेरे हिस्से के मौके में अभी एक मौका बाकी है..,’
 पोलीस असो वा राजकारणी कुणालाही न घाबरता आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव  राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो. गुन्हेगारीकडे तो कसा वळतो? शिवाय इमरान व जॉनच्या लढाईत कोण जिंकतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे.   येत्या 19 मार्चला संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

Web Title: john abraham starrer Mumbai Saga Trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.