John abraham reduced his weight up to 12 kg for satyamev jayate 2 | 'सत्यमेव जयते 2'मध्ये जॉन साकारणार डबल रोल, सिनेमासाठी कमी केलं 10 ते 12 किलो वजन

'सत्यमेव जयते 2'मध्ये जॉन साकारणार डबल रोल, सिनेमासाठी कमी केलं 10 ते 12 किलो वजन

'सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम ट्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळाली होती. पण वास्तव काहीतरी वेगळंच आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, जॉन अब्राहमची या सिनेमात डबल रोल करणार आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे.त्याचवेळी, दुसर्‍या भूमिकेत तो शत्रूंना ठिकाण्यावर लावताना दिसेल. जॉन सत्याग्रह आणि हिंसा यामाध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या धडा शिकवताना दिसणार आहे. जॉन यात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.


10 ते 12 किलो कमी केलं वजन 
रिपोर्टनुसार या सिनेमासाठी जॉनने 10 ते 12 किलो वजन कमी केलं आहे. पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फाडला होता. या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे कारवाई करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी इंस्टाग्रामवर ‘सत्यमेव जयते 2’च्या सेटवरच्या जॉन अब्राहमच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे. ‘हा हात नव्हे, जॉन अब्राहमचा हातोडा’ असे कॅप्शन देत मिलापने हा फोटो शेअर केला होता.


‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.मे महिन्यात 12 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सत्यमेव जयते 2 सोबत जॉन लवकरच शाहरुख खानसोबत पठाण या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: John abraham reduced his weight up to 12 kg for satyamev jayate 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.