john abraham introduces his six babies aka super bikes on social media | जॉन अब्राहमने शेअर केला आपल्या मुलांचा व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क
जॉन अब्राहमने शेअर केला आपल्या मुलांचा व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क

ठळक मुद्देजॉनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास उद्या शुक्रवारी त्याचा ‘पागलपंती’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

अभिनेता जॉन अब्राहमने 2014 मध्ये प्रिया रूंचालसोबत लग्न केले. या लग्नाची माहिती तुम्हाला असेलच. पण जॉनच्या मुलांबद्दल तुम्ही काही जाणता? जॉनला एक नाही तर सहा मुले आहेत. आपल्या या मुलांवर जॉन पत्नी प्रियापेक्षाही अधिक  प्रेम  करतो. वाचून धक्का बसला ना. पण हे खरे आहे. नुकताच जॉनने आपल्या ‘बेबीज्’चा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत जॉन त्याच्या सहा मुलांसोबत दिसतोय. ही सहा मुले म्हणजे, त्याच्या सहा बाईक्स.


होय, जॉनचे बाईक  प्रेम  तुम्हाला ठाऊक असेलच. जॉनकडे शानदार बाईक्सचे कलेक्शन आहे. यात  Kawasaki Ninja ZX 14R, Aprilia RSV4, Yamaha R1, Ducati Panigale V4, MV Augusta F3 800, Yamaha VMax यांचा समावेश आहे. याच बाईक्सचा व्हिडीओ जॉनने शेअर केला आहे आणि याला ‘My babies’ असे कॅप्शन दिले आहे.


जॉनच्या कलेक्शनमधील या बाईक्स पाहून चाहते थक्क झालेले दिसत आहे. जॉनचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
जॉनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास उद्या शुक्रवारी त्याचा ‘पागलपंती’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. यात जॉनसोबत अनिल कपूर, पुलकित सम्राट, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, अर्शद वारसी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या काळात मुंबई सागा, सत्यमेव जयते 2 या सिनेमांमध्ये तो दिसणार आहे.  

Web Title: john abraham introduces his six babies aka super bikes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.