John abraham injures himself while shooting for an action sequence for attack | 'अटॅक' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान जॉन अब्राहम झाला जखमी, अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत

'अटॅक' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान जॉन अब्राहम झाला जखमी, अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम शूटिंग दरम्यान सिनेमाच्या सेटवर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जॉनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होतो आहे. जॉन सध्या अटॅक या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमातील एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे रक्त वाहू लागले.

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ज्या मार्गाने हे सुरू झाले आणि ज्या मार्गाने  पुढे जात आहे. खूप मजा येते. प्रत्येक भागात मजा आहे. या व्हिडिओमध्ये, मेकअप आर्टिस्टने सांगितले की हा लाल रंग नसून प्रत्यक्षात रक्त आहे. यापूर्वीही जॉनने अटॅक या चित्रपटाच्या सेटमधून बाईक चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

अटॅकमध्ये जॉनसोबत रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस जॉन मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमाची निर्मिती स्वत: जॉन अब्राहम, जयंतीलाल गाडा आणि अजय कपूर यांनी केली आहे. याशिवाय लवकरच जॉन अब्राहम दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानसमवेत 'पठाण' या चित्रपटाl  दिसणार आहे. त्याचबरोबर जॉनच्या सत्यमेव जयते चित्रपटाची चाहतेदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सत्यमेव जयते'मध्ये जॉन पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो चित्रपटात भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: John abraham injures himself while shooting for an action sequence for attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.