John abraham announces satyameva jayate2 release date on 14th may 2021 | जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनी चाहत्यांना दिली अनोखी भेट, 'सत्यमेव जयते 2' जाहीर केली रिलीज डेट

जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनी चाहत्यांना दिली अनोखी भेट, 'सत्यमेव जयते 2' जाहीर केली रिलीज डेट

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनी चाहत्यांना भेट दिली. त्याने आपल्या आगामी 'सत्यमेव जयते 2' सिनेमाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. तिरंग्या सोबतचा आपला फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   2018 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यमेव जयते'च्या पहिल्या भागात भ्रष्टाचाराला सामोरे जाण्याची गोष्ट दाखवण्यात आली होती.

जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' 14 मे 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ही  हा सिनेमा 12 मे रोजी रिलीज होणार होता, मात्र दोनवेळा या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

10 ते 12 किलो कमी केलं वजन
 रिपोर्टनुसार या सिनेमासाठी जॉनने 10 ते 12 किलो वजन कमी केलं आहे. पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फाडला होता. या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे कारवाई करताना दिसणार आहे.

‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.मे महिन्यात 12 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सत्यमेव जयते 2 सोबत जॉन लवकरच शाहरुख खानसोबत पठाण या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: John abraham announces satyameva jayate2 release date on 14th may 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.