अभिनेता जॅकी भगनानीने आपलं नवं गाणं 'आ जाना'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना जॅकीने तिच्या फॅन्सशी थेट संवाद साधला. गायक दर्शन रावल आणि जॅकी भगनानी याला वेगळ्या पद्धतीने पोस्टर लाँच करण्याचा निर्णाय घेतला त्यामुळे त्यांनी पोस्टर लाँचिंग दरम्यान फॅन्सशी संवाद साधला. 'कमरिया' गाण्यानंतर जॅकी आणि दर्शन पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

'आ जाना' गाण्याला  दर्शन रावल आणि प्रकृति कक्कडने आवाज दिला आहे. जजस्ट म्युझिकने मिळून याची निर्मिती केली आहे. जॅकी आणि सारावर चित्रित या गाण्यात आपल्याला लंडनचे दर्शन घडणार आहे. उद्या हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकीचे फॅन्स त्याचे हे गाणं ऐकण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.  


जॅकी हा निर्माता वासू भगनानीचा मुलगा आहे. जॅकी भगनानीने 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपटला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फ्लॉप ठरला. 2011 मध्ये F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या तो पित्याचा निर्मिती व्यवसाय सांभाळतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा नाव भूमी पेडणेकरसोबत जोडण्यात आले होते.  

Web Title: Jckky Bhagnani launch poster of upcoming track 'Aa Jaana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.