Jaya saha admits that she procured cbd oil for shraddha kapoor and madhu mantena drug chat case ncb probe | श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल

श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल

सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींची नावं समोर येतायेत. एनसीबीची टीम फुल अ‍ॅक्शनमध्ये आलेली दिसतेय. ड्रग्स कनेक्शन संदर्भात एनसीबीची चौकशी सतत सुरु आहे.सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आज पुन्हा एनसीबी चौकशी करणार आहे. 


ड्रग्सप्रकरणात एनसीबीने आवळला फास 
ड्रग्स प्रकरणात आज एनसीबी तिसऱ्या दिवशी जया साहाची चौकशी करणार आहे. बॉलिवूड निर्माता मधु मंटेना वर्माला सुद्धा एनसीबीने आज चौकशीसाठी बोलवलं आहे.मधुचे बॉलीवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी त्याचे जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याला समन्स बजाविले आहे. एनसीबी जया साहा आणि मधु मंटेना यांना एकत्र बसवून चौकशी करणार आहे. एनसीबी क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा सीईओ ध्रुवची एनसीबी आज पुन्हा चौकशी करणार आहे. मंगळवारी ही ध्रुवची एनसीबीने चौकशी केली होती. 
 

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार जया साहा, मधु मंटेना वर्मा आणि  ध्रुव हे सगळे क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीशी संबंधीत आहेत. जया आणि मधुचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले आहे. जया साहाचे अनेक लोकांसोबतचे ड्रग्स चॅटसमोर आले आहेत. जयाने श्रद्धा कपूर, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि मधु मंटेनासाठी सीबीडी ऑयल मागवले होते. जयाने हे देखील सांगितले की यासाठी तिने कोणत्याच ड्रग्स पेडलरशी संपर्क केला नाही. 

 एनसीबीच्या चौकशीत जया साहाने श्रद्धा कपूरसह बाकी सेलेब्ससाठी सीबीडी मागवल्याचे कबूल केले आहे. जयाचे नम्रता शिरोडकरसोबतचे ड्रग्सचे चॅटदेखील समोर आले. तर दुसरीकडे जयाच्या क्वान कंपनीची मॅनेजर करिश्माचे दीपिका पादुकोणसोबतचे ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर खळबळ उडाली. 


सारा,श्रद्धा, रकुलप्रती आणि दीपिकाला एनसीबी पाठवू शकते समन 
गेल्या दोन दिवसांपासून ड्रग्स रॅकेटमध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना एनसीबी समन पाठवण्याच्या तयारीत आहे. याचसोबत दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगला सुद्धा एनसीबी समन पाठवणार आहे. सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सुशांत आणि रियासोबत जाऊन लोणावळ्याच्या फार्महाऊसवर पार्टी करायचे. या पार्टीत ड्रग्स आणि गांजाचे सेवन केले जायचे अशी माहितीसमोर येते आहे. 

 

ड्रग्स केसमध्ये सलमान खानचं नाव येताच लीगल टीमने दिलं 'हे' स्पष्टीकरण!

दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर!

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jaya saha admits that she procured cbd oil for shraddha kapoor and madhu mantena drug chat case ncb probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.