फरहान अख्तर. फरहान मॉडेल शिबानी दांडेकर हे दोघे सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत आणि हे दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात. . गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे हे कपल आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता या दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरूवातही झाली आहे. मात्र अद्याप लग्नाची तारिख समोर आलेली नाही. 


लाव्हई हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार पहिल्यांदाच फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी फराहन आणि शबानीच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिपोर्टनुसार ते म्हणाले,  ''मला आता तुमच्याकडून लग्नाबाबत कळले. फरहानच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याच्यासोबत होता. मात्र तो मला याविषयी काही बोलला नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मुलं खूप काही लपवून ठेवतात.''  शिबानी बाबत बोलताना ते म्हणाले, ''मी अनेकवेळा तिला भेटलो आहे ती खूपच गोड मुलगी आहे.''         


शिबानी ही प्रसिद्ध मॉडेल असून ती तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.टाइमपास’ या मराठी चित्रपटातील ‘ही पोरगी साजूक तुपातली’ या गाण्यात आपल्याला शिबानीला पाहायला मिळाले होते.


फरहान अख्तरने भाग मिल्खा भाग, दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता त्याचा आगामी चित्रपट तुफान २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.


फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. २००० मध्ये फरहान आणि अधुना विवाहबंधनात अडकले होते. पहिल्या पत्नीपासून फरहानला दोन मुली आहेत. फरहान व अधुनाचा संसार १५ वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. आता हे कपल लग्न करणार म्हटल्यावर जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी दोघेही कोणतीही कसर सोडणार नाही हे मात्र नक्की.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Javed akhtar reaction on son farhan khan marriage rumours with shibani dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.