javed akhtar congratulated janmashtami trolls happened due to this mistake | जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना जावेद अख्तर ‘चुकले’, नेटक-यांनी ‘नको ते’ सुनावले!!

जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना जावेद अख्तर ‘चुकले’, नेटक-यांनी ‘नको ते’ सुनावले!!

ठळक मुद्देसोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर जावेद अख्तर यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी लगेच आपली पोस्ट डिलीट केली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात. पण या शुभेच्छा देताना एक गडबड झाली आणि जावेद अख्तर सोशल मीडियावर नको इतके ट्रोल झालेत.
जावेद अख्तर यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देणा-या या पोस्टमध्ये फार काही लिहिले नव्हते. फक्त, हॅपी जन्माष्टमी इतकेच त्यांना लिहायचे होते. पण त्यातही ते चूक करून बसले आणि ट्रोल झालेत. ‘Happy Janmash’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. मग काय, त्यांची ही पोस्ट बघून युजर्सने त्यांची मजा घेणे सुरु केले. काहींनी त्यांची खिल्ली उडवली तर काहींनी यानिमित्ताने त्यांच्यावर टीका करण्याची संधी साधली.

‘दोन शब्द तर बरोबर लिहू शकत नाही, लेखक कसे बनलात तुम्ही? ,’ असा सवाल एका युजरने त्यांना केला. अन्य एका युजरने टीकेच्या स्वरात लिहिले, ‘सेक्युलर जावेद साहब, बकरी ईदच्या शुभेच्छा तर तुम्ही दिल्याच नाहीत. सगळे लक्षात ठेवले जाईल. अगदी तोलून मापून वागता तुम्ही.’

अन्य एका युजरने   ‘सर, हातांनी ट्विट करता की पायांनी?’ असे लिहित जावेद यांची खिल्ली उडवली.
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर जावेद अख्तर यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी लगेच आपली पोस्ट डिलीट केली. जावेद अख्तर हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. अनेक मुद्यांवर स्वत:चे मत ते मांडत असतात.   या मतांमुळे अनेकदा ते ट्रोलही होतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: javed akhtar congratulated janmashtami trolls happened due to this mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.