ठळक मुद्देजान्हवीचा ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट एक बायोपिक आहे. 13 मार्च 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर सध्या ‘गुंजन सक्सेना’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ‘रूही अफ्जा’,‘तख्त’, ‘दोस्ताना 2’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत. एकंदर काय तर जान्हवी सध्या जाम बिझी आहे. अशात लग्नाचा विषय तिच्या मनातही फिरकायचा  नाही. पण हो, लग्नाचे तिचे प्लॅनिंग मात्र अगदी तगडे आहे. हा प्लान अगदी तयार आहे. लग्न कुठे करणार, यावेळी कुठले कपडे घालणार, इतकेच काय तर लग्नाचा मेन्यू काय असणार हे सगळे सगळे तिने अगदी पक्के ठरवलेले आहे.


‘ब्राईड्स टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने लग्नाचा अख्खा प्लान तयार असल्याचे सांगितले. लग्नाबद्दल विचारले असता ती अगदी भरभरून बोलली. ‘लग्न कधी करणार, हे मला माहित नाही. पण हो, लग्न कुठे होणार, हे मात्र मला ठाऊक आहे. मला माझ्या लग्नात फार बडेजाव नको आहे. माझे लग्न तिरूपतीमध्ये होणार आणि अगदी पारंपरिक पद्धतीने होणार, हे मला माहित आहे. लग्नात मी कांजीवरम जरीची साडी नेसणार. माझ्या लग्नात इडली-सांभर, दही-भात, खीर असे माझ्या आवडीचे दाक्षिणात्य खाद्य पदार्थ असणार,’ असे ती म्हणाली.


तुला कसा पार्टनर हवा, या प्रश्नावर ती म्हणाली की, तो अ‍ॅक्टर असो वा आणखी कुणी,मात्र तो खूप संयमी आणि हुशार असायला हवा. मला त्याच्याकडून शिकता येईल, असा जबरदस्त सेन्स आॅफ ह्युमर असलेला आणि माझ्यासाठी वेडा असलेला जोडीदार मला हवा.


 आई श्रीदेवीबद्दलही जान्हवीने अनेक खुलासे केलेत. तुझ्या लग्नाबद्दल कधी आईशी चर्चा केली होतीस का? असे विचारले असता जान्हवीने मजेशीर उत्तर दिले. माझी मुलांची निवड तिला न पटणारी होती. मी कुणावरही अगदी सहज भाळते, चटकन विश्वास ठेवते, असे आईचे मत होते. त्यामुळे माझ्यासाठी ती स्वत:च मुलगा शोधणार, हे तिने पक्के ठरवले होते, असे जान्हवी म्हणाली.
जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट एक बायोपिक आहे. 13 मार्च 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 


 

Web Title: janhvi kapoor wedding actress reveals about her wedding destination wedding dress on menu know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.