जान्हवी कपूर तिच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. धडक सिनेमानंतर जान्हवीने आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे अल्पावधीतच रसिकांची लाडकी बनली.  जान्हवी सध्या 'रूहीआफ्जा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमातील तिचा लूक समोर आला आहे. अगदी साध्या लूकमध्ये जान्हवी या फोटोत पाहायला मिळत आहे. यापूर्वी धडक सिनेमात ती साडी परिधान केलेली एक सर्वसमान्य मुलीच्या भूमिकेत ती दिसली होती. 


त्यानंतर आता ती रूहीआफ्जा सिनेमात नॉन ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळणार असे या फोटोवरून स्पष्ट होत आहे. जान्हवी 'तख्त' आणि कारगिल गर्ल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेनावर आधारित हा सिनेमा असून यात जान्हवी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्माने केले आहे.

 

 

तर आता 'रूहीआफ्जा' सिनेमात ती आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. कारण पहिल्यांदाच जान्हवी डबल रोल साकारणार आहे. रूही आणि अफसाना अशा दोन भूमिका ती वठवणार आहे.हार्द‍िक मेहताचा हा सिनेमा असून एक हॉरर कॉमेडी असणार आहे.


‘रूहीआफ्जा’ या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव लीड रोलमध्ये आहे. दिनेश विजान व मृगदीप सिंह निर्मित हा चित्रपट हार्दिक मेहता दिग्दर्शित करतोय. २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: Janhvi kapoor simple look on set of roohiafza In uttarakhand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.