जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांनी सैराट सिनेमाचा रिमेक धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून जान्हवी आणि इशाने रसिकांची मनं जिंकली. एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर. असंच काहीसं जान्हवी आणि इशान या दोघांबाबतही घडलं. काही महिन्यांपूर्वी इशानने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच जान्हवीसाठी खास अमेरिकेहून विशेष गिफ्ट मागवलं होतं. हे गिफ्ट पाहून जान्हवीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तेव्हापासूनच जान्हवीसुद्धा इशानवर लट्टू झाल्याचे बोललं जात आहे. 


इतकेच नव्हेतर जान्हवीच्या घरीही इशानचे येणे -जाणे वाढले आहे. इशानची जान्हवीसह असलेली मैत्री कपुर कुटुंबियांनाही पसंत असल्याची माहिती समोर येत आहे . इशान जेव्हा- जेव्हा जान्हवीच्या घरी जातो तेव्हा त्याचा खूप चांगल्या रितीने पाहूणचार केला जातो. तसेच पापा बोनी कपूर यांनाही इशान पसंत असल्याचे दिसते. बोनी कपूर आणि इशान यांच्यात तासन् तास गप्पा रंगतात. तर दुसरीकडे बहिण खुशी आणि अंशुलाही जान्हवीला इशानच्या नावाने चिडवत असतात. 


'धडक' सिनेमा नंतर इशान आणि जान्हवी पुन्हा एकदा एकत्र रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'डियर कॉमरेड'च्या हिंदी रिमेकमध्ये हे दोघे झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. लवकरच या सिनेमाविषयी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच जान्हवी 'रुहीआफजा'  आणि 'तख्त' सिनेमात झळकणार आहे. 

इशान आधी जान्हवीचे नाव कथित बॉयफ्रेंड अक्षत राजनशीही जोडलं गेले होते. नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अक्षतसह जान्हवी गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन थिरकत असल्याचे पाहायला मिळालं होतं. याशिवाय एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यांत जान्हवी, अक्षत, बोनी कपूर आणि श्रीदेवी दिसत होते. 

Web Title: Janhvi kapoor Family Approves Her Relationship With ishaan khatter Dhadak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.