ठळक मुद्देश्रीदेवींचे निधन झाले त्यावेळी जान्हवी ‘धडक’ या तिच्या पहिल्या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होती.

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींचे निधन झाले. दुबईत एका लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी पुन्हा परतल्याच नाहीत. श्रीदेवींच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली.   बोनी कपूर, जान्हवी व खुशी आजही या दु:खातून सावरलेले नाहीत. आज आईच्या पुण्यतिथीला जान्हवी भावूक झाली. आईसोबतचा एक जुना फोटो शेअर करत तिने एक भावूक मॅसेज लिहिला.
जान्हवीने शेअर केलेला फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आहे. यातील मायलेकीचे प्रेम स्पष्ट दिसतेय. ‘तुझी रोज आठवण येते...,’ असे हा फोटो शेअर करताना जान्हवीने लिहिले आहे.


जान्हवीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. करण जोहरने हार्टचा इमोटिकॉन पोस्ट केला आहे. तर फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राने जान्हवीप्रती प्रेम व्यक्त केले आहे.
श्रीदेवींचे निधन झाले त्यावेळी जान्हवी ‘धडक’ या तिच्या पहिल्या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होती. आईच्या निधनाची बातमी जान्हवीसाठी मोठा ‘सदमा’ होता. श्रीदेवींना जान्हवीला स्टार झालेले बघायचे होते. पण जान्हवीचा डेब्यू सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यांनी जगाला अलविदा म्हटले.


श्रीदेवी मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या वर्षी दुबईला गेल्या होत्या, त्यावेळी त्या जुमैरा एमिरेट्स टॉवरमध्ये थांबल्या होत्या. याच हॉटेलमधील वॉशरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर डिनरला बाहेर जाणार असल्याने त्या आवरायला वॉशरूमला गेल्या होत्या. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला असता पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी पडलेल्या त्यांना दिसल्या.

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली. ही बातमी प्रसारमाध्यमात आल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनाला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.  

Web Title: janhvi kapoor emotional post sridevi death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.