Janhvi bought luxury car, Sridevi in memory of her mother and connection with this car | आईच्या आठवणीत जान्हवीने विकत घेतली लक्झरी कार, श्रीदेवी आणि या कारमध्ये आहे हे कनेक्शन
आईच्या आठवणीत जान्हवीने विकत घेतली लक्झरी कार, श्रीदेवी आणि या कारमध्ये आहे हे कनेक्शन


बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरचे तिची आई म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीवर खूप प्रेम होते. आईच्या निधनानंतर जान्हवी व तिची छोटी बहीण खुशी आईला खूप मिस करत असतात. जान्हवी कधीच आपल्या आईबद्दल बोलण्याची संधी सोडत नाही. आता तर जान्हवीने स्वतःलाच नवीन लक्झरी कार गिफ्ट केली आहे आणि या गाडीचं कनेक्शन तिची आई म्हणजेच श्रीदेवीसोबत आहे. 


जान्हवी कपूर नुकतीच तिच्या नव्या लक्झरी कार मर्सिडीज मॅबॅचमधून बाहेर पडताना दिसली होती. पॅपराझीने जान्हवीचे फोटो घेतले आणि त्यावेळी सगळ्यांचं लक्ष तिच्या गाडीच्या नंबर प्लेटवर गेले. जान्हवीने आईच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी नवीन पद्धत आजमावली आहे.


जर तुम्ही श्रीदेवीचे चाहते असाल तर तुमच्या लक्षात असेल की तिच्याकडेदेखील पांढऱ्या रंगाची मर्सिडिज होती. या गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबर प्लेटवर MH 02 DZ 7666 लिहिलं होतं. श्रीदेवीला या नंबरच्या गाडीतून नवरा बोनी कपूर, मुली खुशी व जान्हवीसोबत ट्रॅव्हल करताना पाहिले होते. जान्हवी नेहमी सांगते की, तिला कशाप्रकारे आईची आठवण येते आणि तिने आईच्या गाडीची नंबर प्लेट बनवून आईला सदैव सोबत ठेवण्याची पद्धत वापरली आहे.


जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तिच्याकडे बॉलिवूडचे मोठे प्रोजेक्ट आहेत. ती गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल व रूही अफ्जा या चित्रपटात झळकणार आहे. या व्यतिरिक्त ती करण जोहरचे मोठे सिनेमे दोस्ताना २, बॉम्बे गर्ल व तख्तमध्येदेखील दिसणार आहे.

Web Title: Janhvi bought luxury car, Sridevi in memory of her mother and connection with this car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.