अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटामधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. त्या दोघांमध्ये खूप चांगलं बॉण्डिंग आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले.

ईशान खट्टरने नुकतीच इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे ज्यात जान्हवी काहीतरी पदार्थ बनविताना दिसते आहे. या स्टोरीसोबत ईशानने शेफ जान्हवी असे म्हटले आहे. या व्हिडिओत जान्हवीने ग्रे टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान केला होता.

ईशान खट्टर व जान्हवी कपूर या दोघांचे अफेयर असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांनी सुरू आहे. मात्र करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करण शोमध्ये जान्हवीने सांगितले की, ईशान फक्त खूप चांगले मित्र आहे. तसेच याबद्दल ईशाननेदेखील याच शोमध्ये आम्ही मित्र असल्याचे सांगितले.

जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटानंतर सध्या दोन चित्रपटाच्या कामात बिझी आहे.

एक म्हणजे, गुंजन सक्सेनाचे बायोपिक आणि दुसरा म्हणजे, तख्त. गुंजन सक्सेनाच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरु आहे. तर तख्त अद्यापही प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. तख्त हा चित्रपट पुढील वर्षी फ्लोअरवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यापूर्वी जान्हवी 'रूहअफ्जा' पूर्ण करणार आहे. याचवर्षी जूनमध्ये रूहअफ्जाचे शूटींग सुरु होत आहे. २० मार्च, २०२० रोजी हा चित्रपट रिलीज होईल.

या चित्रपटात राजकुमारसोबत जान्हवी झळकणार आहे. जान्हवी पहिल्यांदाच राजकुमारसोबत काम करणार आहे. जान्हवीला आगामी प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Janhavi Kapoor Banlie Chef, Ishan Khattar shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.