कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती.त्यामुळे शाळा,कॉलेज, मॉल,जिम आणि थिएटर्स बंद आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान आपल्या फार्महाऊसवर कुटुंबीयासोबत थांबला आहे. सलमानसोबत याच फार्म हाऊसमध्ये त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा दीर्घकाळापासून आहेत. 

राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार जॅकलिनने सलमान खानचे फार्महाऊस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार जॅकलिनची मैत्रीण मानसिक तणावाखाली आहे. यामुळे कठीण काळात तिच्यासोबत जॅकलिन राहायला गेली आहे. लॉकडाऊन दरम्यान जॅकलिनची मैत्रिण मुंबईत एकटी आहे. जॅकलिनला जसे समजले की, सध्या तिची मैत्रिण तणावाखाली आहे, तशी ती पनवेलहून थेट मुंबईत तिच्या घरी रहायला गेली. यावेळी तिच्या मैत्रिणीला सध्या तिची जास्त गरज आहे हे कळल्यावर जॅक तिच्यासोबत राहायला गेली. दोघी चांगल्या मैत्रिणी आहे.

 लॉकडाऊमध्ये सलमान खानसोबत जॅकलिने एक रोमाँटिक नंबरमध्ये दिसली होती. 'तेरे बिना' हे सलमान आणि जॅकलिनचे गाणं फॅन्सना चांगलंच पसंत पडले होते. गाण्याने यूट्यूबवर जबरदस्त रेकॉर्डसुद्धा बनवला होता.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jacqueline fernandez was at salman khans farm house during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.