ठळक मुद्देजॅकलिनने गुलाबी रंगाची साडी आणि त्याला साजेशे अशी ज्वेलरी घातली होती. तसेच तिने मेकअप देखील खूपच कमी केला होता. 

जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले असून तिच्या सौंदर्यावर तर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. जॅकलिन नुकतीच एका स्टोर लाँचच्या इव्हेंटला पोहोचली होती. या इव्हेंटला ती खूपच सुंदर दिसत होती. या इव्हेंटमधील तिच्या लूकची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

जॅकलिनने या इव्हेंटला साडी घातली होती आणि ती या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचे या इव्हेंटमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत जॅकलिन ग्लॅमरस दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. डिझायनर फाल्गुनीच्या स्टोर लाँचला ती हटक्या अंदाजात दिसली. हा इव्हेंट काला घोडा येथे झाला होता. या इव्हेंटला तिने गुलाबी रंगाची साडी आणि त्याला साजेशे अशी ज्वेलरी घातली होती. तसेच तिने मेकअप देखील खूपच कमी केला होता. 

चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश आणि अरेबिक भाषादेखील येते. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत होते. ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच किकच्या सिक्वलमध्ये ती सलमानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jacqueline Fernandez Looks Gorgeous In saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.