बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. साऊदी अरेबियाच्या (कासा) एअरपोर्टवर जॅकलिन अशी पहिली महिला अभिनेत्री आहे जिची जाहिरातीत याठिकाणी दाखवली जात आहे. जी जाहिरात लोकांच्या पसंतीस देखील उतरली आहे.   साहोमध्ये जॅकने एक आयटम साँग केले होते. प्रभास आणि जॅकलिनची सिजलिंग केमिस्ट्री या गाण्यात दिसली होती. या गाण्यासाठी जॅकलिने 2 कोटी रुपये आकारले होते.  


जॅकलिनच्या लव्ह लाईफबाबत बोलायचे झाले तर तिचे बहरीनचा राजा प्रिन्स शेख हसन राशिद अल खलीफासोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होती. एका कॉमन फ्रेंडच्या पार्टींमध्ये ती हसनला भेटली होती. हाऊसफुल २ चित्रपट प्रदर्शित होता होता ब्रेकअप झालं होतं.

खलिफासोबतच्या ब्रेकअपचं कारण साजिद खान होता. जॅकलिनचं साजिद सोबतही बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. २०१३ साली दोघांचं ब्रेकअप झालं. पुन्हा एकदा जॅकलिन आणि साजिद खान जवळ येत असल्याची चर्चा आहे. 


नुकतेच जॅकलिन ‘ड्राइव्ह’चित्रपटातील ‘मखना’ हे गाणे लाँच झाले आहे.ड्राइव्ह’ या चित्रपटातील ‘मखना’ हे प्रेपी साँग असून यात सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही आगळीवेगळी आणि फ्रेश जोडी दिसतेय. या गाण्यात सुशांत-जॅकलिन हे त्यांच्या फ्रेंडससोबत मजा करताना दिसत आहेत. हे गाणे तनिष बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. 

Web Title: Jacqueline fernandez kingdom of saudi arabia airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.