चिट्टीयां कल्लाइयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या एका स्टाफ मेंबरला कार भेट म्हणून दिली आहे. तिच्या या कृतीचे चाहते आणि लोक खूप कौतूक करत आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरपैकी एका सदस्याला दसऱ्याच्या दिवशी सरप्राइज दिले आहे. हा सदस्या तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे. तिने त्याला कार गिफ्ट केली पण तिला माहित नव्हते की कारची डिलेव्हरी कधी होणार आहे. त्यामुळे जॅकलिन कार डिलेव्हरी झाली तेव्हा ट्राफिक पोलिस हवालदारच्या वेशात दिसते आहे. त्यावेळी ती चित्रपटाच्या सेटवर होती. यापूर्वीदेखील जॅकलिनने आपल्या मेकअप आर्टिस्टला एक कार गिफ्ट दिली होती.


जॅकलिनने इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत. या आनंदाच्या क्षणी जॅकलिनने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.

मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने असा फोटो पहिल्यांदा शेअर केला नाही. तर यापूर्वीदेखील तिने टॉपलेस फोटो शेअर केला आहेत. फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी जॅकलिनने टॉपलेस होऊन फोटोशूट केले होते.


जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती. लवकरच ती जॉन अब्राहमचा चित्रपट अटॅकमध्ये दिसणार आहे. तसेच किक 2मध्ये झळकणार आहे. याशिवाय रणवीर सिंगसोबत सर्कसमध्ये दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jacqueline Fernandez gifted a car to her staff member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.