बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच 'ड्राईव्ह' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच 'ड्राईव्ह' सिनेमातील एका गाण्याचं शूटिंग करत होते. त्यावेळी जॅकलीन सेटवर बेशुद्ध झाली होती.

खरेतर जॅकलीनने नुकतेच ड्राईव्ह चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती खूप अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. हे अॅक्शन सीन शूट करत असताना बऱ्याचदा तिला दुखापतही झाली. तरीदेखील तिने शूट थांबवलं नाही. तर तिने शूटिंग पूर्ण केलं.

'ड्राइव्ह' चित्रपटातील कर्मा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि हे गाणं प्रेक्षकांना खूपच आवडलं. या गाण्याच्या वेळी समजलं की, या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान जॅकलीनला दुखापत झाली होती. तिला मोठ्या हिलची सॅण्डल घालून डान्स करायचा होता. दुखापत झालेली असतानाही जॅकलिनने कर्मा गाण्यावरील डान्सचा सराव केला होता. याचे परिणाम नंतर पहायला मिळाले. कर्मा गाण्याच्या शूटिंगदरम्यान जॅकलिन बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिने गाणं पूर्ण शूट केलं आणि सेटवर सर्वांनी तिच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेसाठी टाळ्या वाजवून कौतूक केलं.


ड्राइव्ह हा चित्रपट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

ड्राइव्ह चित्रपटाचे दिग्दर्शन तरूण मनसुखानीने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.


 

Web Title: Jacqueline Fernandez Gets Fainted On Shooting Set Of Sushant Singh Rajput Starrer Netflix Drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.