चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. सोशल मीडियावर जॅकलिन बरीच अॅक्टिव्ह असते. जॅकलिन तिच्या पसर्नल लाईफला घेऊन चर्चेत आली आहे.

बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार जॅकलिन आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड दिग्दर्शक साजिद खान यांच्यातील संबंध पुन्हा पूर्ववत होते आहेत. दोघ जवळपास 6 वर्ष एकमेकांना भेटले नव्हते. रिपोर्टनुसार दोघांनी एकत्र एकमेकांशी बोलणं सुरु केले.  'मिसेज सीरियल किलर'च्या शूटिंगनंतर साजिद जॅकलिनला सोडण्यासाठी घरपर्यंत गेला. यावरुन अंदाज लावू शकतो कदाचित या नात्याला एक संधी देऊ इच्छित आहेत.        


'हाऊसफुल 2' च्या शूटिंग दरम्यान साजिद आणि जॅकलिनची लव्हस्टोरी सुरु झाली होती. 2012मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. २०१३ साली दोघांचं ब्रेकअप झालं. साजिद खानने देखील तिच्यावर काही आरोप केले होते. साजिदनं एका पत्रकार परिषदेत जॅकलिनचं नाव न घेता त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रत्येक गोष्टीत संशय घेत होती. त्यामुळे ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. याशिवाय त्याचे चित्रपट फ्लॉप होण्यामागेदेखील जॅकलिन जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.


साजिदनं एका पत्रकार परिषदेत जॅकलिनचं नाव न घेता त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रत्येक गोष्टीत संशय घेत होती. त्यामुळे ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. याशिवाय त्याचे चित्रपट फ्लॉप होण्यामागेदेखील जॅकलिन जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.

Web Title: Jacqueline fernandez and sajid khan friends again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.