ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मंदाकिनीने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मंदाकिनीचे खरे नाव आहे यास्मिन जोसेफ. या यास्मिनला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते.

पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे मंदाकिनीला बॉलिवूडमधून मोठ्या दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा दुसरा चित्रपट एवढा हिट नव्हता जेवढा तिचा पहिला चित्रपट सुपरहिट होता तरी देखील प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला.


'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला 1994-95 साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत पाहिले होते. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही.

मात्र 1996 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जोरदारसोबत तिचे करियर संपुष्ठात आले. असेही बोलले जाते की दाऊदमुळेच मंदाकिनीला सिनेमात काम मिळत होते. बदनामीमुळे तिला काम मिळणं कमी झाले होते.

1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते.

1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: It is difficult to identify the actress who gave a bold scene in 'Ram Teri Ganga Maili', TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.