बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर सध्या काय करतोय? तर एका ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटाची तयारी करतोय आणि या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाचे नाव काय तर संजय लीला भन्साळी. होय,ताजी खबर खरी मानाल तर भन्साळींनी आपल्या पुढील चित्रपटासाठी ईशान खट्टरशी संपर्क साधला आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण भन्साळींच्या या आगामी चित्रपटात ईशान महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याची चर्चा जोरात आहे.


सूत्रांचे मानाल तर भन्साळींनी ईशानचा ‘धडक’ हा सिनेमा पाहिला. या चित्रपटातील ईशानच्या अभिनयाने भन्साळी प्रचंड प्रभावित झालेत आणि त्याचक्षणी आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी ईशानला साईन करण्याचे त्यांनी ठरवले. गतवर्षी रिलीज झालेल्या भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात ईशानचा मोठा भाऊ शाहिद कपूर दिसला होता. आता शाहिदनंतर भन्साळी ईशानसोबत काम करताना दिसतील.


२०१८ मध्ये आलेल्या ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून ईशानने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण या पहिल्याच चित्रपटातील ईशानच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. यानंतर धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटात ईशानची वर्णी लागली.

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने या चित्रपटातून डेब्यू केला. ‘धडक’  हा चित्रपट मराठी सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक होता. यातील ईशान व जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आणि हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर हिट झाला. याच चित्रपटाने ईशानला भन्साळीसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर भन्साळींसारख्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणे ही मोठी संधी आहे. आता फक्त ईशान या संधीचे सोने कसे करतो, तेच बघायचेय.

Web Title: ishaan khatter in sanjay leela bhansalis next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.