मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये म्हणजे 'मिर्झापूर २'मध्ये काही नवे चेहरेही दिसले आहेत. मुख्य भूमिकांसोबतच त्यांच्या कामाचीही प्रशंसा केली जात आहे. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते कालीन भैयाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपासून दूर ठेवणाऱ्या माधुरी देवीने. माधुरी देवीची भूमिका अभिनेत्री ईशा तलवारने साकारली आहे. ईशा ही अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीची भूमिक साकारणाऱ्या ईशाचं बॅकग्राऊंडही फिल्मी आहे. तिचे वडील विनोद तलवार हेही अभिनेते आहेत.

ईशा तलवारचा जन्म मुंबईत झाला आणि तिने टेरेंस लुईस डान्स स्कूलमधून डान्सचे अनेक प्रकारही शिकले आहेत. ज्यात जॅज, हिपहॉप, साल्साचा समावेश आहे. ईशा सिनेमासोबतच ४० वर जाहिरातींमध्येही दिसली आहे. ईशाने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात साऊथ इंडस्ट्रीमधून केली होती.  तिने २०१२ मध्ये मल्याळम सिनेमातून डेब्यू केलं होतं. ('मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी!)

ईशाचा हा साऊथमधील पहिला सिनेमा सुपरहिट ठरला होता. ईशाने त्यानंतर काही वर्षे साऊथ इंडस्ट्रीत काम केलं आणि इथे तिने मोठी लोकप्रियताही मिळवली. त्यानंतर २०१७ साली ईशा ट्यूबलाइट सिनेमात काही मिनिटांसाठी दिसली होती. पण २०१८ मध्ये सैफ अली खानच्या कालाकांडीतून तिने मुख्य रूपाने बॉलिवूड डेब्यू केलं होतं. (इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स)

त्यानंतर ईशा आयुष्मान खुराणाच्या आर्टिकल १५, संजय मिश्राचा सिनेमा कामयाब आणि नेटफ्लिक्सची वेबसीरीज गिन्नी वेड्स सनीमध्येही विक्रांत मेसी व यामी गौतमसोबत दिसली. ईशाने तिच्या मिर्झापूर २ मधील कामाने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. ती आता राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी तूफान सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूरसोबत दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Isha Talwar became Munna Tripathi wife in Mirzapur season two, Know abut her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.