ठळक मुद्देसुमारे 8 वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतर ईशा प्रचंड दु:खी झाली होती. यातून सावरण्यास तिला बराच वेळ लागला.

भारताचा माजी क्रिकेटपटू जहीर खानने 2017 मध्ये अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केले. आज दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. पण सागरिका हिच्याआधी जहीर दुस-याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाला होता. होय, या अभिनेत्री नाव होते ईशा शरवानी. ईशा ही बॉलिवूड अभिनेत्री व डान्सर आहे. आज ईशाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला ईशा व जहीरच्या अधु-या राहिल्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.


सुभाष घई यांनी इशाला पहिला ब्रेक दिला होता. याच ईशाच्या प्रेमात जहीर अक्षरश: वेडा झाला होता. केवळ जहीर हाच नाही तर ईशाही त्याच्या प्रेमात होती. दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. त्याचमुळे दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण एवढे करूनही दोघांचे नाते ‘निकाह’पर्यंत पोहोचू शकले नाहीत.

दोघांची पहिली भेट 2005 मध्ये झाली होती. टीम इंडिया आॅस्ट्रेलियाच्या दौ-यावरून परतणार होती. निरोप समारोहादरम्यान ईशाने एक धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. जहीरने या कार्यक्रमात पहिल्यांदा ईशाला पाहिले होते. पण हे पहिल्या नजरेतले प्रेम नक्कीच नव्हते. पण पुढे दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम.

जहीरची मॅच पाहायला ईशा मैदानावर दिसू लागली. यानंतर दोघांतही काहीतरी खिचडी शिजत असल्याचे मानले जाऊ लागले. 2011 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान ईशा व जहीर लग्न करणार, अशाही बातम्या आल्यात. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली.


सुमारे 8 वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतर ईशा प्रचंड दु:खी झाली होती. यातून सावरण्यास तिला बराच वेळ लागला. मी आजही जहीर माझा चांगला मित्र मानते, असे ईशा यानंतर एका मुलाखतीत म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: isha sharvani birthday special when she was in relationship with zahir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.