चंदेरी दुनियेत मेकपविना राहणे म्हणजे आश्चर्याची बाबच मानली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री स्वतःचे नो - मेकअप फोटो शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री इशा कोपिकरचा विनामेकअप लूक समोर आला आहे. तिचा हा फोटो पाहून सारेच थक्क होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोत इशा विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे.


तसेच हा फोटो मेकअपविना असला तरीही निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.  या फोटोंमुळे बरेच चाहत्यांना इशा कोपिकरला ओळखणेही कठिण झाले आहे. तर काहींनी विनामेकअप फोटो शेअर केल्यामुळे इशा कोपीकरचे कौतुकही करत आहेत. सध्या इशा सिनेमांपासून लांब असली तरी संसारत रमली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते.


नुकत्याच एका  दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक अनुभव सांगितला. “ही 2000 मधील गोष्ट आहे. मी त्या अभिनेत्याच्या घरी गेले. मला कामाची गरज होती त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता मी त्याला भेटायला गेली. त्यावेळी काम मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने मला त्याच्यासोबत झोपण्यास सांगितले. परंतु त्याला मी साफ नकार दिला. माझ्या नकारामुळे नाराज झालेल्या त्या अभिनेत्याने माझे फिल्मी करिअर सुरु होण्याआधीच संपवण्याची धमकी दिली होती. परंतु त्याच्या मानसिक दबावाला मी बळी पडले नाही.”

 

ईशाने पुढे सांगितले की, तिने त्या अभिनेत्यासोबत कधीच काम केले नाही. काही टॉप सेक्रेटरीजनेही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी सेल्फ डिफेन्स सुरु केल्याचे ईशा म्हणाली.

Web Title: Isha Koppikar Without Make Up Look will shock you !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.