isha koppikar remark on rajnikanth and ajith makes fans angry |  रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!!
 रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!!

ठळक मुद्देईशाने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. पण २००९ मध्ये तिने टिमी नारंगसोबत लग्न केले आणि बॉलिवूडपटांत तिला काम मिळणे बंद झाले.

डॉन ,  कृष्णा कॉटेज  यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर सुमारे १८ वर्षांनंतर साऊथ इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. नरसिम्मा हा ईशाचा शेवटचा साऊथ चित्रपटात होता. पण आता अभिनेता शिवकार्तिकेयच्या आगामी चित्रपटात ईशा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा सायन्स फिक्शन सिनेमा एलियनवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशाने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत साऊथ मेगास्टार रजनीकांत आणि अजित कुमार यांच्याबद्दल बोलून फसली. मग काय, लोकांनी ईशाला प्रचंड ट्रोल करणे सुरु केले.
अजित कुमार व रजनीकांत हे दोन्ही सुपरस्टार साऊथच्या चाहत्यांच्या गळ्यांतील ताईत आहेत. ताज्या मुलाखतीत ईशाला या दोघांबद्दल विचारण्यात आले. पण हे काय, अजित सध्या इंडस्ट्रीत आहे की नाही, ते मला ठाऊक नाही, असे सांगून ईशाने स्वत:च वाद ओढवून घेतला.

मी अजित कुमार यांची चाहती आहे. पण ते आता इंडस्ट्रीत काम करतात की नाही, हे मला ठाऊक नाही,असे ती म्हणाली. ईशाचे शब्द ऐकून अजित कुमारने चाहते भडकले नसतील तर नवल. या भडकलेल्या चाहत्यांनी ईशाला चांगलेच फैलावर घेतले. तुला साऊथ इंडस्ट्रीबद्दल माहित नाही तर इथे काम करायला का आलीस? असा खोचक प्रश्न अनेकांनी यानंतर तिला केला.
आपल्या या मुलाखतीत ईशाने शिवकार्तिकेयची तुलना रजनीकांत यांच्याशी केली. इथेही ती फसली. शिवकार्तिकेय मला रजनीकांत यांची आठवण करून देतो, असे ती म्हणाली आणि रजनीकांत यांचे चाहतेही ईशावर बरसले. ईशाने अजित कुमार व रजनीकांत दोघांचाही अपमान केला, असे सांगत चाहत्यांनी तिला ट्रोल केले.


ईशाने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. पण २००९ मध्ये तिने टिमी नारंगसोबत लग्न केले आणि बॉलिवूडपटांत तिला काम मिळणे बंद झाले. मराठी सिनेमात मात्र ती आजही अ‍ॅक्टिव्ह आहे.

Web Title: isha koppikar remark on rajnikanth and ajith makes fans angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.