Palak Tiwari बॉलिवूडच्या या स्टारकिडला करतेय डेट?, त्याच्यासोबत कॅमेऱ्यात झाली कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:58 AM2022-01-22T10:58:32+5:302022-01-22T11:00:57+5:30

पलक तिवारी (Palak Tiwari)चा स्टारकिडसोबत गाडीतला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Is Palak Tiwari dating this Bollywood starkid ?, captured on camera with him | Palak Tiwari बॉलिवूडच्या या स्टारकिडला करतेय डेट?, त्याच्यासोबत कॅमेऱ्यात झाली कैद

Palak Tiwari बॉलिवूडच्या या स्टारकिडला करतेय डेट?, त्याच्यासोबत कॅमेऱ्यात झाली कैद

Next

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)चा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. त्याचवेळी चाहतेही इब्राहिमच्या बॉलिवूड डेब्यूची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, इब्राहिमचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)ची मुलगी पलक तिवारी(Palak Tiwari) सोबत दिसत आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये पलक तिवारी पापाराझींना पाहून चेहरा लपवताना दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा करत आहेत.

पलक तिवारी आणि इब्राहिमचे फोटो आणि व्हिडिओ अनेक पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही कारमध्ये एकत्र दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर पलकने तिचा चेहरा लपवला आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्सने या व्हिडिओवर लिहिले आहे की, कदाचित दोघे एकमेकांना डेट करत आहेत. त्याच वेळी, इतर काही वापरकर्त्यांनी देखील खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.


पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक एकीकडे तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते, तर दुसरीकडे तिची स्टाईलही चाहत्यांना खूप आवडते. पलकचे इन्स्टाग्रामवर जवळपास १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. 

पलकने बिजली गाण्यातून लुटले चाहत्यांची मने
पलक तिवारीने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली होती आणि तिने चाहत्यांची मने लुटली आहेत.

Web Title: Is Palak Tiwari dating this Bollywood starkid ?, captured on camera with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app