बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा सध्या तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच तिने फोटोशूट देखील केले होते ज्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली होती. इराने आता बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटो तिने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. इराने लिहिले कॅप्शनवरुन नेटकऱ्यांनी तिला उलटं सुलटं प्रश्न विचारले आहे. इराने लिहिले आहे की, सगळं काही ठिक होईल.     
या फोटोत इरा बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत रोमान्टिक पोझ देताना दिसतेय. तसेच इरानेचा मिशालसोबतचा एक रोमान्टिक डान्स व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  


गेल्या अनेक दिवसांपासून इरा व मिशाल एकत्र दिसत होते. यानंतर  फॅन्सच्या प्रश्नांची उत्तर देताना इराने मिशालसोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. 


इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता.

सध्या ती दिग्दर्शक राम माधवानी यांच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करतेय.  इरा याठिकाणी फिल्म मेकिंगचे बारकावे शिकत आहे. विशेष म्हणजे तिला मेकिंगच्या कोर टीममध्येही संधी देण्यात आली आहे.
 


Web Title: Ira khan shares a romantic picture with her boyfriend mishaal kirplani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.