बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान  नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह असेल्या अफेअरमुळे रोज तिच्या चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे इरा बॉयफ्रेंडसह सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच इरा खान आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

 

जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसवर इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तरी इराला अजिबात फरक पडणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनसाठी रेडी असल्याची पोस्टच तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. इराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

तसेच ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आण रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. मीडियामध्येही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’


वयाच्या १४व्या वर्षी लैंगिक अत्याचार

मी 14 वर्षांचा असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी काय घडत आहे हे मला माहित नव्हते, परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. होय, मला असं वाटलं की, माझ्याबरोबर असं का होऊ दिलं, पण मी आयुष्यातला हा इतका मोठा धक्का मानला नव्हता की मी नैराश्यात जाईन..मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या मित्रांना आणि पालकांना सांगू शकते, परंतु काय सांगावे. ते मला काय विचारणार? तर मी काय सांगू.

माझ्यासोबत काही वाईट घडलेच नाही असं मी अनुभवत आहे. या विचारसरणीने मला त्यांच्याशी बोलण्यास थांबवले आहे आणि दूर ठेवले आहे." तसेच इराने शेअर केलेल्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले असल्याचे सांगत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ira Khan Is Ready For The Lockdown With Boyfriend Nupur Shikhare, Share Romntic Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.