बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान रिलेशनशिपमध्ये आहे. ती वडिलांच्याच फिटनेस कोच नुपूर शिखरला  डेट करत आहे. 
नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. ताज्या रिपोर्टनुसार नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अप्रत्यक्षणे दोघांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. गेल्या वर्षी  मिसल कृपलानीसोबत इरा खानचे अफेअर होते. दोघांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता नुपूरबरोबरच्या इराचे फोटो पाहून ती  पुन्हा प्रेमात पडल्याचे स्पष्ट होते.  इरा खानने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही,  ती थिएटर आणि दिग्दर्शनात तिची आवड जोपासत आहे. आमिर खानची मुलगी म्हणून इरा खान सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे लाखोंमध्ये फॉलोअर्सही आहेत.


इरा खान आणि नुपूर शिखर लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊस इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करत आहेत. दोघेही एकमेकांच्या आईला भेटले आहेत. या नात्यासाठी इरा आणि नूपूर दोघेही फार सिरिअस आहेत.आतापर्यंत आमीर खानची पहिली पत्नी आणि इरा खानची आई रीना दत्ता यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु इरा खान नुपूरच्या आईच्या पोस्टवर नेहमीच कमेंट करत असल्याचे पाहायला मिळते. एकंदरितच इरा नुपूरच्या कुटुंबासह चांगले बॉन्डींग बनवण्याच्या प्रयत्नात आहे. 


नुकतेच नुपूरने आपल्या आईचा एक फोटो शेअर केला होता. यावर इराने खूप सुंदर कमेंट केली होती.दोघांचा एक फोटोही शेअर केला होता.  "आम्हा दोघांनाही स्टायलिश ड्रेसिंग  करायला आणि मनसोक्त मजा करायला आवडते " असे कॅप्शनमध्ये लिहिले होते.ताना नुपूरने इमोजीही तयार केली होती. इरा खानने अजूनतरी तिच्या नवीन प्रेमाची कबुली दिलेली नाही.


वयाच्या १४व्या वर्षी लैंगिक अत्याचार

 मी 14 वर्षांचा असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी काय घडत आहे हे मला माहित नव्हते, परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. होय, मला असं वाटलं की, माझ्याबरोबर असं का होऊ दिलं, पण मी आयुष्यातला हा इतका मोठा धक्का मानला नव्हता की मी नैराश्यात जाईन. मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या मित्रांना आणि पालकांना सांगू शकते, परंतु काय सांगावे. ते मला काय विचारणार? तर मी काय सांगू. माझ्यासोबत काही वाईट घडलेच नाही असं मी अनुभवत आहे. या विचारसरणीने मला त्यांच्याशी बोलण्यास थांबवले आहे आणि दूर ठेवले आहे."


पालकांच्या घटस्फोटावर खुलासा 

व्हिडिओमध्ये इरा खानने तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, "मी लहान असताना माझ्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता, परंतु मला याबद्दल धक्का बसला नव्हता. माझ्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत, विखुरलेले कुटुंब नाही आहे. मी ६ वर्षांची होते, तेव्हा मला टीबी झाला होता. त्यामुळे टीबी माझ्यासाठी इतकी वाईट गोष्ट नव्हती की ज्यामुळे मी दुखी आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ira Khan finds love in Aamir Khan's fitness coach Nupur Shikhare during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.