ठळक मुद्देसमीराने आता तिच्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले असून एका अनोख्या अंदाजात तिने तिच्या मुलीच्या नावाविषयी सगळ्यांना सांगितले आहे. तिने तिच्या मुलीला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

समीरा रेड्डीने नुकताच म्हणजेच १२ जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीरा आता दुसऱ्यांदा आई बनली आहे. खुद्द समीरानेच आपल्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही खुशखबर त्याच्या फॅन्सना दिली होती. शेअर केलेल्या फोटोत आपल्याला बाळाचा केवळ हात पाहायला मिळाला होता. समीराची ही पोस्ट पाहाताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. 

समीराने आता तिच्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले असून एका अनोख्या अंदाजात तिने तिच्या मुलीच्या नावाविषयी सगळ्यांना सांगितले आहे. तिने तिच्या मुलासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. समीराने आणि त्याने त्याच्या हातात नायरा असे लिहिलेले पोस्टर घेतले असल्याचे दिसून येत आहे.

तसेच तिने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोत तिने तिला उचलले असून आपल्याला तिच्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. या फोटोसोबत तिने लिहिले होते की, मला सध्या झोपायला देखील वेळ मिळत नाहीये. पण माझ्या मुलीमुळे मी माझ्यावरील असलेला ताण विसरून गेले आहे.

 

 

 

समीराने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिच्या हातात चिमुकली मुलगी दिसत असून तिने या फोटोसोबत खूप छान पोस्ट देखील लिहिली होती. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, या लहान मुलीने मला प्रचंड ताकद दिली आहे. मला आता पुन्हा एकदा स्वतःला शोधण्याची संधी मिळणार आहे. तिला माहितेय मी, भरकटली होती... पण ती मला एक नवीन मार्ग मिळून देणार आहे. मी माझी प्रेग्नन्सी एन्जॉय केली. या काळात मला लोकांनी साथ दिली, माझ्यासोबत सतत राहिले त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आम्हाला नेहमीच मुलगी हवी होती आणि आता ती आमच्या आयुष्यात आली. 

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, बोमण ईराणी आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली. यामागे बाळाचे प्लॅनिंग हेच कारण होते. दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी शेअर करताना समीरा यावर बोलली होती. हा आमचा प्लान्ड बेबी आहे. त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टला नकार दिला होता, असे तिने सांगितले होते.

अडीच वर्षांच्या डेटिंगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते. ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Introducing Sameera Reddy's Baby Daughter - Nyra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.