बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आय् वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. मात्र यांत एक स्टार किड अपवाद ठरला आहे.  स्टारकिड्स खूप चर्चेत असताना बॉबी देओलचा मुलगा आर्यमान  मात्र फारसा चर्चेत आला नाही. नुकतेच बॉबी देओलने त्याच्या बर्थ डेच्या दिवशी आर्यमानसह शेअर केलेला फोटो नेटीझन्सना इतका आवडला की, आर्यमानने बॉलिवूडमध्ये एंट्री करावी अशा कमेंट करत असल्याचे पाहायला मिळतंय. त्याचे लुक्स आणि त्याची पर्सनालिटी पाहता तो बॉलिवूडसाठी एक चांगला चेहरा असल्याचे नेटीझन्स सांगताना दिसतायेत. एकंदरितच त्याच्या एका फोटोने त्याच्यावर सारेच फिदा होताना दिसतायेत. 


काहींनी तर बॉबी देओलला मुलासोबत ‘सोल्जर २’ चित्रपट बनव असाही सल्ला दिला आहे. आर्यमानला लाईमलाईटमध्ये राहायला फारसं आवडत नाही. त्यामुळे तो यापूर्वी कधीच चर्चेत आला नव्हता.

'आयफा' पुरस्कार सोहळ्यात त्याला वडिलांसोबत पाहिलं गेलं. त्या कार्यक्रमातील फोटोसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. येत्या काळात आर्यमानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली तर सा-यांना चांगली तगडी टक्कर तो देणार हे मात्र नक्की. 


सनी देओलचा मुलगा करण देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. करणच्या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर बॉलिवूडमधील मंडळींनीही करणचे भरभरून कौतुक केले होते. सनीसोबत अनेक चित्रपटात झळकलेल्या सलमान खानने ट्विटरवर हा टीजर शेअर करत लिहिले होते की, करण तुला खूप साऱ्या शुभेच्छा... पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे.......

Web Title: The Internet Is Crushing On Bobby Deol's Son Aryaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.