Imran Hashmi's sister is this famous Bollywood actress, you will be surprised to know the name | इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने 2003 साली विक्रम भटच्या दिग्दर्शनाखाली फूटपाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण  केले. इमरान हाश्मीने विविध भूमिका साकारून अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. पण, तुम्हाला माहिती आहे का की इमरान हाश्मीची बहीणही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्याची बहिण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इमरान हाश्मीच्या बहिणीचे नाव आलिया भट आहे.

आलिया भट्ट इमरान हाश्मीची चुलत बहीण आहे. वास्तविक, इमरान हाश्मीच्या आजीच्या बहिणीचे नाव शिरीन मोहम्मद अली होते. शिरीन मोहम्मद अली महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई होती. इमरान आणि आलिया या नात्यातून भावंडे आहेत. उल्लेखनीय आहे की एकदा चित्रपट निर्माते आलिया भट सोबत काम करण्याच्या प्रस्तावाला इमरान हाश्मीकडे गेले होते. इमरानने चित्रपट निर्मात्यांना नकार दिला.


इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट चुलतभाऊ बहीण आहेत. आलिया भट बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे.आलिया भट आणि इमरान हाश्मी कधी चित्रपटात एकत्र दिसतील का? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर नेहमीच नाही असेल. एका मुलाखती दरम्यान स्वत: इम्रान हाश्मीने असे म्हटले होते की त्याच्यासाठी आणि आलियासाठी एका चित्रपटात एकत्र काम करणे शक्य नाही. कारण प्रत्येकाला भाऊ आणि बहीण यांच्यामधील एक रोमँटिक सीन पाहणे विचित्र वाटेल.


त्यांच्या नात्याबाबत इमरानने सांगितले की, आलिया तिचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट न पाहिल्यामुळे बर्‍याच दिवसांपासून माझ्यावर रागावली होती. मी तिचा चित्रपट बघितल्याशिवाय आलिया माझ्याशी बोलत नव्हती. म्हणजेच हे निश्चित आहे की हे दोघे कधीही चित्रपटात एकत्र दिसणार नाहीत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Imran Hashmi's sister is this famous Bollywood actress, you will be surprised to know the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.