इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 06:11 PM2021-02-27T18:11:24+5:302021-02-27T18:12:08+5:30

इमरान हाश्मी लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या चित्रपटात झळकणार आहे.

Imran Hashmi rejects romantic film with Alia Bhatt, because you will be surprised to read | इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

बॉलिवूडचा सीरिअल किसर इमरान हाश्मी लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या चित्रपटात झळकणार आहे. इमरान हाश्मीला रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जाते. मात्र, एका रोमँटिक चित्रपटामध्ये आलिया भटसोबत काम करण्यास इमरान हाश्मीने नकार दिला होता. आलियासोबत चित्रपटाला नकार दिल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्याने आलिया सोबत काम करण्यास नकार का दिला हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते. अखेर त्यामागचे कारण समोर आले आहे.  


आलिया भटसोबत चित्रपटात काम करण्यास नकार देण्यामागचा खुलासा स्वत: इमरान हाश्मीने केला आहे. इमरान हाश्मी महेश भट यांचा भाचा आहे म्हणजेच आलिया इमरानची चुलत बहिण आहे. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. टायगर ३ या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेमध्ये इमरान हाश्मी दिसणार आहे.‘टायगर ३’ चित्रपटाचे पहिले शेड्युल मार्च २०२१च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत पार पडणार आहे.


शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या शूटिंगनंतर ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे असे सांगितले जात आहे. ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानची काही मिनिटांची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरान हाश्मी मार्चमध्येच या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता असून तिसरे आणि शेवटचे वेळापत्रक पुन्हा मुंबईत होणार आहे. मया चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये होणार होते. मात्र आता चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये होणार आहे.

Web Title: Imran Hashmi rejects romantic film with Alia Bhatt, because you will be surprised to read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.